पुणे :
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), गणेशखिंड, पुणे येथे नुकतीच “अॅकडमिक एक्सलेन्स अँड यूज ऑफ नॉलेज रिसोर्सेस” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा पी.एम. – उषा (प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान) या राष्ट्रीय योजनेंतर्गत आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या भाषणाने झाले. त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्राध्यापकानी विविध स्रोतांचा उपयोग कसा करावा, यावर भर दिला.
प्रा. शुभदा नगरकर (विभागप्रमुख, ग्रंथालयशास्त्र व माहितीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी “रिसर्च अँड पब्लिकेशन एथिक्स” या विषयावर मार्गदर्शन करताना संशोधनातील नैतिकता ही केवळ औपचारिकता नसून वैज्ञानिक प्रगतीचा मूलाधार असल्याचे सांगितले.प्रा. श्रुती तांबे (माजी विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी “अॅकडमिक एक्सलेन्स थ्रू ग्लोबल लेन्स ” या विषयावर जागतिक ज्ञानाच्या चौकटीतून शैक्षणिक उत्कृष्टतेची संकल्पना स्पष्ट केली. डॉ.अनीश के.आर. (राजागिरी कॉलेज, केरळ) यांनी “टेक्नॉलजी इंटेग्रेटेड पेडागोगी” या विषयावर शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर व प्रभावी उदाहरणे मांडली.
दुसऱ्या दिवशी प्रा. वैशाली दिवाकर (माजी विभागप्रमुख, समाजशास्त्र, सेंट मीरा कॉलेज) यांनी ऑडिओ-व्हिज्युअल्सचा ज्ञान स्रोत म्हणून वापर यावर मार्गदर्शन केले. प्रा.मीनल ओक (ग्रंथपाल, एम.ई.एस.आय. एम. सी. सी.) यांनी ई-ज्ञान स्रोत व पोर्टल्सची माहिती दिली.शेवटच्या सत्रात प्रा.गीता चढ्ढा (प्रोफेसर, आझीम प्रेमजी विद्यापीठ) यांनी आंतरशाखीय ज्ञानाची आवश्यकता आणि भविष्यातील संकल्पनेवर विचार मांडले. कार्यशाळेची सांगता प्राचार्य डॉ. संजय खरात यांच्या समारोपपर भाषणाने झाली.ही कार्यशाळा डॉ. विनय कुमार(पी.एम. – उषा समन्वयक), डॉ. ज्योती गगनग्रास(उपप्राचार्य कला व विभागप्रमुख, समाजशास्त्र) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. मेघा देशपांडे व प्रा पूजा यादव यांच्या समन्वयाने पार पडली.
या सर्व कार्यक्रमाला डाॅ जोत्स्ना एकबोटे,सहकार्यावाह पी ई सोसायटी, प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह पी ई सोसायटी यांनी अभिनंदन केले. ही कार्यशाळा पी ई सोसायटी कार्याध्यक्ष डाॅ गजानन एकबोटे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पार पडली.