पुणे :
पुणे शहरातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा, औंध कडून पुणे मार्गाने येणाऱ्या रस्त्यावरील, पुणे विद्यापीठ चौक येथील उड्डाणपुलाचे सर्व काम पूर्ण झाले असूनही, फक्त आणि फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन व्हावे या राजकीय दिखाव्यासाठी हा पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी मनसे सरचिटणीस रणजीत दादा शिरोळे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, जनहित शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, महाराष्ट्र राज्य संघटक प्रशांत कानोजिया, मयूर बोलाडे औंध मनसे शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर, उपविभाग अध्यक्ष गौरव खेडेकर, शाखा अध्यक्ष निखिल जोशी आदी पदाधिकारी उपस्तेथित होते.
शासन व प्रशासनाने नागरिकांच्या वेळेची, इंधनाची व कष्टांची खिल्ली उडवत या पुलावर कृत्रिम अडथळे निर्माण केले होते. नागरिकांची रोजची होणारी दमछाक, वाढलेली वाहतूक कोंडी, तासन्तास वाया जाणारा वेळ याला जबाबदार कोण? जनतेच्या पैशातून तयार झालेल्या सोयीसुविधांवर असे राजकीय अडथळे लादणे हा जनतेचा अपमान आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेत अनौपचारिक पद्धतीने उड्डाणपुलाचे उदघाटन करून नागरिकांच्या वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात आला. पोलिस प्रशासनाचा तीव्र विरोध असूनही, शासनाच्या दबावाला न जुमानता मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष केला आणि जनतेला दिलासा मिळवून दिला.
मनसेचा स्पष्ट संदेश असा की – जनतेच्या हिताला विरोध करून, त्यांच्या सोयीसुविधांना अडथळे निर्माण करून राजकीय फायदा मिळवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, त्यासाठी कोणाचाही दबाव झेलण्याची तयारी आमच्याकडे आहे.