बाणेर :
बाणेर मधील योगीराज पतसंस्थेतील कर्मचा-यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून व 1 लाख दिवाळी अॅडव्हान्स असे एकूण 27 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, संस्थेच्या प्रगतीमध्ये संचालकांचा जसा वाटा आहे तेवढाच कर्मचाऱ्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. सर्व कर्मचारी वर्षभर प्रामाणिकपणे व वेळेची पर्वा न करता काम करत असतात त्यामुळे त्यांना बक्षीस म्हणून प्रतिवर्षा प्रमाणे 1 महिन्याचा पगार बोनस देण्यात येत आहे. तसेच वाढती महागाई च्या अनुषंगाने प्रत्येकी 1 लाख दिवाळी अॅडव्हान्स सर्व कर्मचा-यांना देण्यात आला आहे. बाणेर व कृष्णानगर शाखेच्या कर्मचार्यांना एकूण 27 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. संस्थेचा शिपाई असो किंवा व्यवस्थापक सर्व कर्मचारी वर्गाची दिवाळी आनंदात जावी हाच यामागील हेतू आहे.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव मुरकुटे, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, सदस्य अनिल खैरे, माजी संचालक अमर लोंढे, अॅड. अशोक रानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.