पुणे :
26 ऑक्टोबर रोजी शॉर्टसर्किटमुळे आगीत कोहिनूर लॉन्ड्री दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या दुर्दैव घटनेने दुकान मालक रत्नाकर नांगरे यांची मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यांना पुन्हा लॉन्ड्री व्यवसाय उभा करून देण्यासाठी लॉन्ड्री व्यावसायिक संघ पुणे व परीट समाज बांधवांनी केलेला संकल्प त्यांना मदत करून पूर्णत्वास नेलेला आहे.







पुणे लॉन्ड्री व्यवसायिक संघ , पुणे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना नाशिककर व तसेच विद्यमान अध्यक्ष गणेश चव्हाण व सचिव निलेश राऊत यांच्या पुढाकाराने लॉन्ड्री व्यवसायिकाच्या आर्थिक साहित्यातून. 61641 रुपये एकूण मदत जमा करून पूरक साहित्य जमा केले त्यामध्ये वायरिंग, रंग, टेबल, काउंटर, हँगर, बोर्ड इत्यादी वस्तूं रुपात मदत म्हणून देण्यात आल्या. तसेच महाबळेश्वर येथील ज्येष्ठ लॉन्ड्री व्यावसायिक बळवंतराव साळुंखे यांनी नवी कोरी इस्त्री मदत म्हणून दिली.
रत्नाकर नांगरे यांचा नारायण पेठेतील कोहिनूर वाशिंग कंपनी आणि लॉन्ड्री व्यवसाय सर्वांच्या सहकार्यातून दिनांक 16 नोव्हेंबर रोजी चालू झाला आहे.







