पुणे : –
शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलच्या पुणे-5 या प्रशालेस 3 MAH AIR SQN NCC, PUNE या Air NCC युनिटला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी “भारतामधील सर्वोत्कृष्ट एनसीसी युनिट” म्हणून गौरविण्यात आले आहे. याबाबतचे अधिकृत पत्र युनिटचे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर शैलेन्द्र एस. मराठे यांनी प्रशालेस पाठविले आहे.







देशातील १७ राज्य संचालनालयांमधील तब्बल ८३७ एनसीसी युनिट्समधून या युनिटची निवड झाल्याने ही कामगिरी अत्यंत उल्लेखनीय मानली जात आहे. शैक्षणिक गुणवत्ता, उत्कृष्ट प्रशिक्षण, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली अढळ बांधिलकी यामुळे हा सन्मान मिळाल्याचे स्पष्ट होते.

या स्क्वाड्रनमधून दरवर्षी सरासरी ३० कॅडेट्स सशस्त्र दलांमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त होतात. तसेच ‘अग्निवीर वायू’ भरती प्रक्रियेतही या युनिटचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन तसेच ANO सेकंड ऑफिसर अमित ओमासे यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कॅडेट्समध्ये देशसेवेची प्रेरणा दृढ होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, माजी नगरसेविका प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, नगरसेविका उपकार्यवाह प्राचार्या डॉ.निवेदिता एकबोटे यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुळधरण, उपमुख्याध्यापिका वंदना सोनोने, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या मानात भर पडली असून शहरासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.








