बाणेर येथे शिवसेनेच्या वतीने ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती मुळे विकास कामांचा अहवाल प्रकाशित !

0
slider_4552

बाणेर :

शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र धनकुडे यांनी बाणेर येथे सोमवार दिनांक १/३ /२०२१ रोजी शिवसेना सदस्य नोंदणी, तसेच महाराष्ट्राच्या विकासामध्ये ठाकरे सरकारने वर्षपूर्ती केली आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत एक वर्षभरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये विकास हा प्रती विश्वास निर्माण केला आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडीने केलेल्या कामांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे ठाकरे सरकारचे हे पत्रक वाटप तसेच नवीन शिवसैनिकांना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी ,सुस, म्हाळुंगे या गावातील अनेक नव युवकांनी शिवसेनेचे सदस्यत्व नोंदनी केली.

शहर प्रमुख सजय मोरे यांनी सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.तर गजानण थरकुडे यांनी शिवबंधन व सदस्य नोंदणीचे महत्व समजावून सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपशहर संघटक नितीन पवार, मुळशी युवा सेना प्रमुख संतोष दादा मोहोळ, कोथरूड विभाग संघटक संजय निम्हण, कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे, शाम बालवडकर, सुनील कळमकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित रणपिसे यांनी केले तर सर्वांचे आभार संजय निम्हण यांनी केले.

 

See also  ग्रंथालय आपल्या दारी या उपक्रमाची राष्ट्रवादीचे डॉ. सागर बालवडकर यांच्या वतीने सुरुवात.