दिल्लीहून डेहराडूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्याला आज अचानक आग

0
slider_4552

डेहराडून :

दिल्लीहून  डेहराडूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. धावत्या ट्रेनला आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. आग लागल्याचं समजताच लोको पायलट आणि गार्ड यांनी प्रसंगावधान दाखवत ट्रेन कांसरो येथे ट्रेन थांबवली. यानंतर राजाजी टायगर रिझर्व्ह आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

एएनआय न्यूज एजन्सीने या संदर्भात ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये एएनआयने आग लागलेल्या ट्रेनचा फोटो ट्विट करत माहिती दिली आहे की, दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसला अचानक आग लागली.एक्स्प्रेसच्या सी-४ डब्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. ही घटना कांसरो जवळ घडली आहे. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील कोचला आग लागल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली. ट्रेन चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. तात्काळ सर्व प्रवाशांना वेळीच ट्रेनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. ट्रेनमधील ज्या डब्याला आग लागली होती तो डबा ट्रेनपासून वेगळा करण्यात आला.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी दाखल झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत रेल्वतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

See also  राहूल गांधी यांचे शेतकऱ्यांना पत्र केले अभिनंदन