पाषाण सुतारवाडी येथील योग भवन येथे लसीकरण केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

0
slider_4552

सूसरोड :

करोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने लसीकरण करणे आवश्यक आहे. पाषाण येथे सूरू असणाऱ्या लसीकरण केंद्रात गर्दी होत आहे. म्हणुनच सुतारवाडी सुस रोड परिसरातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन स्विकृत सदस्य शिवम सुतार यांनी केलेल्या पाठपुरावा तसेच स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर यांच्या प्रयत्ना मुळे योगभवन, पाषाण सुसरोड या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना लसीकरण केंद्र पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले.

यावेळी महापौर मोहोळ यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली तसेच काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली. करोना विरुद्ध लढण्या करिता लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण सुरक्षित असुन ४५ वर्ष वयाच्या वरील सर्व नागरिकांनी लसीकरण करावे तसेच लवकरच लसीकरणाची वयोमर्यादा अजून कमी करण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त नागरीकांना लसीकरणाचा लाभ घेता येईल असे महापौर यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, तसेच स्विकृत सदस्य शिवम सुतार, सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे, उत्तम जाधव, रोहन कोकाटे, आकाश पवार, प्रज्वल कोकाटे,विशाल लांगी, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, डाॅ.गणेश डमाले, केंद्रप्रमुख डाॅ.पल्लवी खिरडकर मॅडम, निखिल निकम उपस्थित होते.

 

See also  बाणेर येथे दोनशे बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार : महापौर