मियावाकी फळांचा वन – बायोडायव्हर्सिटी हिल, बाणेर येथे आगळावेगळा उपक्रम

0
slider_4552

बाणेर :

इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पीरियल : मियावाकी फळांचा वन – बायोडायव्हर्सिटी हिल, बाणेर येथील टेकडीवर आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला.

इनर व्हील क्लब ऑफ पुणे इम्पीरियलतर्फे बाणेर येथील द रियल इस्टेट मॉल मागे असलेल्या बायोडायव्हर्सिटी हिलवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत २५० हून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली. क्लबच्या सदस्या अर्चना लुनावत यांनी मियावाकी पद्धतीने फळांचे वन तयार करण्याची संकल्पना मांडली. हरित आणि शाश्वततेकडे नेणारा हा उपक्रम जैवविविधतेस मोठा हातभार लावणार आहे.

या प्रवासाची सुरुवात ६७ फळझाडांच्या लागवडीने झाली आणि अखेरीस दीड एकर क्षेत्रावर एकूण १२५ फळझाडांची लागवड पूर्ण झाली. मियावाकी पद्धतीमुळे झाडांची जलद वाढ होते, तसेच दीर्घकालीन पर्यावरणीय फायदे मिळतात.

या फळवनामध्ये जांभूळ, आवळा, रामफळ, सीताफळ, चेरी, बेरी, अंजीर यांसारख्या फळझाडांचा समावेश असून बौद्ध, सिंदूर, सौर्डूप यांसारखी महत्त्वाची झाडेही लावण्यात आली आहेत. हा उपक्रम पर्यावरण पुनर्स्थापना आणि समाजाभिमुख हरित कृतींचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

डॉ. निवेदिता दास, अध्यक्ष – आयडब्ल्यूसी पुणे इम्पीरियल, या शाश्वत प्रकल्पांच्या निर्मितीवर दृढ विश्वास ठेवतात, जे भावी पिढ्यांवर कायमस्वरूपी परिणाम घडवतात. त्यांच्या दूरदृष्टी आणि समर्पणामुळे प्रत्येक उपक्रम पर्यावरण संवर्धन व जनजागृतीशी जोडला जातो. त्यांच्या प्रकल्पांमध्ये जिल्हा अध्यक्षा डॉ. आशा देशपांडे यांनी दिलेल्या संकल्पनेचा सुंदर प्रतिबिंब दिसून येतो. या माध्यमातून त्या उज्ज्वल व निरोगी उद्याच्या निर्मितीत मोलाचे योगदान देत आहेत.

See also  शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप