नॅशनल केमिकल लॅबराॅटरी (एन सी एल) पाषाण रोड येथे लॅब ला आग

0
slider_4552

पाषाण :

नॅशनल केमिकल लॅबराॅटरी (एन सी एल) पाषाण रोड येथे मेन बिल्डिंग मधील लॅब नंबर 180 मध्ये आज दुपारी एक 45 वाजताच्या दरम्यान आग लागली होती .तेथील कर्मचाऱ्यांनी वेळीच अस्थाई अग्निशमन यंत्र फायर एक्सटींगुईशेर चा वापर करून आग विझविण्याचे प्रयत्न चालू केले होते पाषाण अग्निशमन केंद्राच्या वाहन वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने तेथील अनर्थ टाळला तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑरगॅनिक साॅलवंटसारखे ज्वालाग्रही केमिकल्स तत्काळ बाजूला हटविण्यात आले त्यामुळे खूप मोठा धोका दुर झाला.

आज दुपारी एक वाजून 52 मिनिटांनी अग्निशमन केंद्राकडे सदरची वर्दी आलेली होती त्याच वेळी अग्निशमन वाहन सदर वर्दीवर सोडण्यात आले सदर वर्दीवर स्टेशन ऑफिसर शिवाजी मेमाणे तसेच जवान बालराज संगम, अंकुश पालवे, रोहित पुष्कराज, बाळासाहेब कारंडे, वाहन चालक राजू शेख इत्यादींनी सदर वर्दीवर काम केले.

See also  किरीट सोमय्या करणार हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड.