अखेर व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सूरु झाले. तब्बल सात तास होते बंद

0
slider_4552

 

अखेर अखेर व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम सूरु झाले. तब्बल सात तास होते बंद होते. कारण अद्याप स्पष्ट नाही परंतू msg सुरू झाले आहे. हळू हळू पूर्वपदावर ॲप येत आहे. देशात अनेक यूजर्सना सोशल मीडिया वापरत असताना अडचणी येत आहेत. सोमवारी रात्री 8.30 नंतर Whatsapp, Facebook आणि अनेक सोशल मीडिया साइट्स बंद पडल्या. Whatsapp down असल्याचं अधिकृतरीत्या अद्याप सांगण्यात आलेलं नसलं तरी जगभरात मोठ्या प्रमाणावर या मोबाइल ॲपला तांत्रिक अडचणींनी घेतलं होतं.

Facebook ची मालकी असलेल्या सगळ्या सोशल मीडिया साइट्सना भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे सोमवारी रात्रीपासून अडचणी येऊ लागल्या. Facebook, Instagram, Whatsapp बंद असल्याचे मेसेज ट्विटरवर (twitter trend)फिरत होते.

Facebook च्या वेबसाइटवर याबद्दल दखल घेण्यात आली. Sorry, something went wrong. We’re working on it and we’ll get it fixed as soon as we can ‘क्षमा करा, काहीतरी बिघडलं आहे. आम्ही ते शोधायचा प्रयत्न करत आहोत. लवकरात लवकर आम्ही दुरुस्ती करू’, असा मेसेज facebook ने त्यांच्या वेबसाइटवर केला होता.

नेमक्या कुठल्या कारणाने हा तांत्रिक बिघाड झाला आहे, किती यूजर्सना याचा फटका बसला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

See also  कोविड प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना : निर्मला सीतारामन