बालेवाडी :
गिरीधर कट्ट्याला झालेल्या चर्चेत ठरल्या नुसार बालेवाडी येथील सोसायट्यांच्या असोसिएशन एरिया सभेची पहिली मिंटींग बालेवाडी येथील कम्फर्ट झोन येथे झाली. एरिया सभेचे महत्व आणि त्यामुळे आपल्या परिसरातील समस्या सोडविण्याकरिता येणारी बळकटी याचे महत्त्व या वेळी चर्चिले गेले.
सुरुवातीला पत्रकार केदार कदम यांनी प्रास्ताविक द्वारे एरिया सभेची निर्मिती करण्यामागचा हेतू सर्वांसमोर मांडला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यात करता एक मजबूत व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने सर्वजण एकत्र आले आहेत. यांच्या एकत्रित येण्याने समस्येचे निराकरण जलद गतीने करण्याकरिता कायद्याच्या चौकटीत एरिया सभेचा वापर व्हावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी रविंद्र सिन्हा यांनी एरिया सभेची संकल्पना सर्वांसमोर मांडताना त्यांनी कायद्याच्या चौकटीत असणारेएरिया सभेचे महत्त्व सर्वांसमोर विशद केले. कायद्यात एरिया सभेबाबत असणारे महत्व आणि नियम त्यांनी सर्वांना सांगीतले.
राजेंद्र चतुर म्हणाले, गिरीधर कट्ट्याच्या माध्यमातून सर्व रहिवासी असोसिएशन एकत्र येऊन परिसरातील समस्या सोडवण्यासाठी एक नवा विचार मांडत आहेत. यामुळे परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
एरिया सभेद्वारे नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी जनमताचा रेटा तयार केला पाहिजे.जनमताचा रेटा तयार होवून समस्यांवर मार्ग निघावे असे अशोक नवल यांनी सांगितले.
लोकांचा सहभाग वाढविला गेला पाहिजे, लोकांमध्ये आपल्या समस्या बद्दल जागरूकता रुजवली पाहिजे. येणाऱ्या समस्या सोडविण्याकरिता प्रत्येकाने वेळ द्यायला हवा. आणि या सभेने कशा पद्धतीने काम करायला हवे याची चर्चा झाली. अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. त्यावर चर्चा होवून एरिया सभेला वेगवेगळ्या एरिया मध्ये सुरुवात करण्याचे ठरले
या वेळी विकास कामत, अशोक नवाल, राजेंद्र चतुर, रविंद्र सिन्हा, डी.डी. सिंग, ॲड.परशुराम तारे, ॲड. सैदप्पा माशाळकर, वैशाली पाटकर, सारंग वाबळे, ॲड इंद्रजित कुलकर्णी, बाळासाहेब दंडवते, मोरेश्वर बालवडकर, केदार कदम, अर्जुन पासले, हरमित विज, मोहसिन शेख, अस्मिता करंदीकर, अभिराज भडकवाड, रविंद्र सिन्हा, विजय गायकवाड, रूपेश जुनावणे, शकिल सलाटी, रमेश रोकडे, हितेंद्र आडमुठे.