ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक

0
slider_4552

मुंबई :

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 डिसेंबरला कोव्हिड टास्क फोर्सच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

या बैठकीत आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसंच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील, यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली.

त्यानुसार आज 24 डिसेंबरला कोरोना संदर्भातल्या निर्बंधाची नवी नियमावली जाहीर करण्याचं ठरलं आहे.

दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसंच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, कोव्हिड-19 चा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’मुळे भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.

भारतात सद्यस्थितीत ‘ओमिक्रॉन’चे फक्त 160 रुग्ण आढळून आले असले तरी, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे भारतात तिसरी लाट येण्याची भीती मात्र कायम आहे.

डेल्टापेक्षा ‘ओमिक्रॉन’ तीन पटींनी जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलीये. भारतात कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटने धुमाकूळ घातला होता.

See also  भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल.