बावधन परिसरात “मन मंदिरा” गजर भक्तीचा भव्य कीर्तन महोत्सव उत्साहात संपन्न.

0
slider_4552

बावधन :

बावधन, पाषाण, सुतारवाडी परिसरात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशन आणि झी टॉकीज यांच्या संयुक्त विद्यमाने “मन मंदिरा” गजर भक्तीचा भव्य कीर्तन महोत्सव आणि श्री साई सत् चरित्र कथा असा सुंदर भक्तिमय भव्य आणि दिव्य कार्यक्रम परिसरातील नागरिकांनी अनुभवला. बावधन कोथरुड पाषाण सुतारवाडी या परिसरामध्ये प्रथमच असा भक्तीचा ठेवा असणारा कार्यक्रम युवा नेते सूर्यकांत भुंडे आणि सुजाता भुंडे यांच्या माध्यमातून भाविकांना पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचे नियोजन सूर्यकांत भुंडे सोशल फाउंडेशन च्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर रीत्या केले होते.

कार्यक्रमाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि कार्यक्रमाचे आयोजक सूर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, बावधन, पाषाण, सुतारवाडी परिसरामधील वातावरण हे सांप्रदायिक असून नागरिकांची आवड जोपासणे हे कर्तव्य समजून “मन मंदिरा” गजर भक्तीचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला परिसरातील सर्वच लहान थोरांनी आवर्जून उपस्थित राहू कार्यक्रमाला दाद दिली याचा आनंद वाटत आहे. हा कार्यक्रम पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान होते. त्यामुळे हा कार्यक्रम घेतल्याचे सार्थकी लागले व मन प्रसन्न झाले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक विनोद नढे, महादेव कोंढरे, शंकर मांडेकर, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, योगेश सुतार, संदीप बालवडकर, सविता दगडे, बबन मा. दगडे, बबन ल. दगडे, तानाजी दगडे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, राहुल दुधाळे, बालम सुतार, नंदकुमार दगडे, कुणाल वेडे, सुदाम भुंडे, हरिभाऊ कोकाटे, दिपक दगडे, आशा भुंडे, रोहिणी सुतार, अभिजीत दगडे, गोरख दगडे, बापू दगडे, राजेंद्र बांदल, संतोष तोंडे, मंगेश निम्हण, मयुर सुतार, अशोक दळवी, शितल दगडे, उज्वला जाधव कल्पना घुले, मंदार घुले, धनंजय दगडे, रंजना दगडे, रेशमा केदारी, आझाद दगडे, सचिन दगडे, गणेश दगडे, राजेंद्र भुंडे, मयूर कांबळे, प्रवीण वैरागर तसेच बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वर वाडी, सुस परिसरातील भक्त – भाविक या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

See also  रामनदीची दयनीय अवस्था, नागरिक गेले अनेक वर्षे प्रयत्नशील, पण पुणे मनपा अजूनही उदासीन.