सोमेश्वर फाउंडेशन तर्फे औंध येथे आयोजित बाल मेळावा उत्साहात पार.

0
slider_4552

औंध :

नववर्षारंभानिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनतर्फे भव्य ‘बालमेळावा’ दि. २ जानेवारी २०२२ रोजी औंध स्कूल येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला होता. या बालमेळाव्यात परिसरातील बालगोपाळांसाठी विविध आकर्षक खेळ, मनोरंजन साधने, आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू उपलब्ध केली होती. या बालमेळाव्यामुळे परिसरातील लहान मुलांचा व त्यांच्या पालकांचा नवीन वर्षाचा प्रारंभ अगदी उत्साहात करता आला. पालकांनी मोठ्या संख्येने पाल्या सोबत उपस्थित राहून मुलांचा उत्साह वाढविला. बऱ्याच काळानंतर लहान मुलांसाठी एक जत्रा भरल्याचा अनुभव घेता आला.

या बाल मेळावा याबद्दल सांगताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, औंध परिसरात भरविला गेलेल्या या बाल मेळाव्या मुळे बाल गोपलांच्या चेहऱ्यावरती आनंद खुलला. मुलांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादा मुळे परिसरात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. विविध खेळ मनोरंजन साधने आकर्षक बक्षिसे भेटवस्तू यांचा पुरेपूर आनंद या बालगोपालांनी घेतला. या बाळ-गोपाळांच्‍या चेहऱ्यावरील आनंद पाहून बाल मेळावा आयोजित केल्याचे समाधान वाटत आहे.

या वेळीऔंध परिसरातील बाल गोपालांनी आपल्या पालकांसोबत सहभाग घेतला. माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी बाल मेळावा आयोजित केल्यामुळे त्यांचे आभार मानले. पालकांनी देखील निम्हण यांनी लहान मुलांनसाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला म्हणून मुलांना सहभागी होवून आनंद घेता आल्याने त्यांचे आभार मानले.

See also  भाईजी क्रिकेट चषक सनी बालवडकर स्पोर्ट क्लब ने पटकवला...