पुणे शहरातील निर्बंध कडक केले जाणार : उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय….!

0
slider_4552

पुणे :

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय.

त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित  रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत.

1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहणार आहेत. कारण, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. तर उद्या, परवापर्यंत कॉलेजबाबतचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’

उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचही अजितदादा म्हणाले.

सार्वजनिक वाहतुकीसाठीही दोन्ही डोस बंधनकारक

पुण्यात उद्यापासून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा असेल तर कोरोना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक असणार आहेत. लसीचो दोन्ही डोस घेतलेले नसतील तर तुम्हाला पीएमपीएमलच्या बसमध्ये प्रवेश मिळणार नाही.

मास्क नसेल तर दंड

इतकंच नाही तर पुण्यात उद्यापासून तोंडावर मास्क लावलेला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचबरोबर तोंडावर मास्क नसेल आणि तो व्यक्ती रस्त्यावर थुंकला तर त्याला 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 5 जानेवारीपासून होणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

मास्क कोणता वापरावा?

वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असं आवाहनही अजित पवार यांनी नागरिकांना केलंय.

See also  शिवाजीनगर येथील पोलीस मनोरंजन केंद्राचे लोकार्पण अजित पवारांच्या हस्ते

पुण्यातील आजची (4 जानेवारी) कोरोना स्थिती

दिवसभरात 1 हजार 104 नवे रुग्ण
दिवसभरात 151 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे शहरातील एका रुग्णाचा मृत्यू
सध्या 89 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू
पुण्यातील एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 5 लाख 12 हजार 689
पुण्यातील सक्रीय रुग्णसंथ्या – 3 हजार 790
पुण्यात एकूण मृत्यू – 9 हजार 119

https://twitter.com/mohol_murlidhar/status/1478353994699313152?t=sRqtEzZy9qeWG6i5wLzNzg&s=19