पुणे :
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून प्रवास करण्यासाठी आता कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत.
आता पीएमपीएमएल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र अथवा युनिव्हर्सल पास दाखवणं बंधनकारक राहणार आहे.उद्यापासून (सोमवार, दि.17) हा बदल लागू होणार आहे.
नवीन नियमावलीचे पत्रक पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील सर्व पीएमपीएमएल बस स्थानकांना पाठविण्यात आले आहे. लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी एक स्वतंत्र टीम तयार केली जाणार आहे.तसेच सरकारी कार्यालये, मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक करण्यात आले आहे.