सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी यांच्या वतीने मकरसंक्रांतीचे निमित्त साधून परिसरातील लहान मुलांसाठी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुलांनी मोठ्या उत्साहात पतंग उडविण्यासाठी उपस्थित राहुन आनंद घेतला. या वेळी संपुर्ण आसमंत, विविध आकार-प्रकारांच्या रंगी-बेरंगी पतंगांनी व्यापून गेले होते.
पतंग महोत्सवाची माहिती देताना युवा नेते सचिन दळवी यांनी सांगितले की, देशभरात संक्रात पतंग उत्सव म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रातही तीळगूळ आणि पतंगाला महत्व आहे. लहान मुलांसाठी पतंग उडविणे म्हणजे फार आनंदाचे असते. मुलांनी मोठ्या आवडीने पतंग घेतला आणि मोठ्या उत्साहात पतंग उडवीत होते. यावेळी मुलांना पतंग उडविताना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुलांना साधा दोरा उपलब्ध करून देऊन केवळ सादया दोऱ्याने पतंग उडविण्यास सांगितले.
या वेळी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे आणि युवा नेते लहू बालवडकर यांच्या हस्ते मुलांना पतंग वाटप केले. या दोन्ही मान्यवरांनी पतंग महोत्सवास उपस्थित राहून छोट्या मुलांचा आनंद वाढविला.