वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सनी निम्हण यांचे सॅनिटायझेशनचे विशेष अभियान सुरू…

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

गेल्या काही दिवसांपासून शहरात ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. औंध बाणेर परीसरात कोरोनाचा वाढता शिरकाव पाहता परीसरात जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. हा कोरोनाचा धोका लक्षात घेऊन माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने ‘सॅनिटाईझ विथ सनी’ हे सोसायटी व वस्ती सॅनिटायझेशन विशेष अभियान पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी व सुतारवाडी या परिसरासाठी सुरू केले आहे.

या अभियानाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता शिरकाव पाहता परीसरात जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. वेळीच सुरक्षिततेची सर्व काळजी न घेतल्यास फार मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच कोरोना नियमांचे पालन करून, सोसायटीतील सार्वजनिक परिसराची स्वच्छता केल्यास आपण या संक्रमणास निश्चितच आळा घालू शकतो. याच कार्यात आपली साथ देण्यासाठी ‘सॅनिटाईझ विथ सनी’* हे सोसायटी व वस्ती सॅनिटायझेशन विशेष अभियान आम्ही *पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी व सुतारवाडी* या परिसरासाठी घेऊन आलो आहोत. या अभियानांतर्गत आमचे सर्व सहकारी सोसायटी सॅनिटाईज करताना कोविड अनुरूप सूचनांचे पालन करतील.

पुढे बोलताना सनी निम्हण यांनी नागरीकांना विनंती केली आहे की, या अभियानांतर्गत आपल्या सोसायटीचा सार्वजनिक परिसर सॅनिटाईझ करुन घेण्यासाठी आम्हाला 8308123555 वर अवश्य संपर्क साधा आणि या अभियानात सहभागी होण्यासाठी आपला राऊंड आजच बुक करून आपली व आपल्या परिसरातील सर्वांची काळजी घेवून कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी हातभार लावावा.

See also  औंध मधील पार्किंग सुविधेची गरज लक्षात घेता प्राधान्याने काम केले: चंद्रकांत पाटील