औंध :
वयस्कर लोकांसाठी विरंगुळा केंद्राची गरज, तसेच वाहनांची वाढती लोकसंख्या पाहता पार्किंग सुविधेची गरज होती, अशी कामे प्राधान्याने नगरसेविका अर्चना मुसळे आणि ॲड. मुसळे करत आहे. सध्या कोरोना वाढत आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. हे वर्ष जगण्याचे वर्ष आहे. आपण पुण्यामध्ये अतिशय अद्यावत असे दोन हॉस्पिटल बनवत आहोत. सर्वांनी कोरोना पासून स्वतःला सांभाळले पाहिजे जर कोरोनाचे संकट परत वाढलेच तर नगरसेवकांनी पुन्हा लोकांच्या मदतीसाठी उभे राहायचे आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडले.
औंध येथे वाहनतळ लोकार्पण सोहळा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका अर्चना मुसळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, ॲड. मधुकर मुसळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, मयूर मुंडे, रोहन कुंभार, सोमनाथ नवले, उमेश घुगे, रवी ओसवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश वझरकर इत्यादी उपस्थित होते आदी उपस्थित होते.
नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेला फंड आम्ही पुरेपूर वापर करत आहोत. ब्रेमेन चौक ते परिहार चौक, आयटीआय रोड अतिशय सुंदर केले आहे. कामात व्यापारी व नागरिकांचे नेहमीच सहकार्य लाभले, व्यापाऱ्यांना पार्किंग सुविधा नसल्याने व्यवसायात अडचणी येत होत्या, म्हणून त्यांना शब्द दिला होता पार्किंग सुविधा देण्याचा तो पूर्ण करीत आहोत.
याप्रसंगी सिद्धार्थ शिरोळे म्हणाले मुसळे यांनी नियमित पाठपुरावा करून समाज उपयोगी कामे मार्गी लावली. असेच कामे त्यांनी भावी आयुष्यातही करावी त्यासाठी शुभेच्छा !
यावेळी ॲड. मधुकर मुसळे यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी मध्ये औंधचे नाव आहे. जेवढ्या स्मार्ट सिटी सिलेक्ट झालेल्या तेवढे आपल्या गावचे रस्ते पाहायला येतात. आंध्रप्रदेशचे तेरा मंत्री पाहून गेले फूटपाथ कसा असायला पाहिजे याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून लॉस एंजेल्स च्या आयपीडीपी जनरल च्या कव्हर पेजवर औंधचा फूटपाथ दाखवला आहे. औंध हे भारतातले उत्कृष्ट उपनगर बनवायचा संकल्प केला असून तो आपण पूर्ण करणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि स्त्रियांसाठी दहा रुपयात औंध मध्ये कुठेही फिरावे म्हणून सीएनजी वर चालणारे टुनटुन गाडीचा उपक्रम केला आहे.