पुणे :
पर्वती येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका लोकार्पण सोहळा उद्घाटन पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक महेश वाबळे, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, लहुजी शक्ती सेना अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे, लहुजी समता मातंग परिषद अध्यक्ष अनिल हातागणे, स्व रूपवर्धिनी कार्याध्यक्ष रामभाऊ डिंबळे, विश्वास जी कुलकर्णी, उत्कर्ष क्रीडा संस्थेचे सचिव योगेश यादव, तसेच पर्वती दर्शन मातंग समाज संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघ व प्रभाग 29 चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमाची प्रस्तावना ज्याच्या संकल्पनेतून व निधीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका सुरु करण्यात आली ते नगरसेवक रघुनाथ गौडा यांनी केलि.
याप्रसंगी बोलताना आमदार माधुरी यांनी वस्ती विभागांमध्ये अशा अभ्यासिका सुरु होणे खूप गरजेचे आहे. रघु गौडा सारखा तुमच्या भागामध्ये एक विद्यार्थी हित जोपासणारा कार्यकर्ता मार्गदर्शक तुम्हाला मिळाला हे खूप महत्वाचे आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
उत्कर्ष क्रीडा संस्था व स्वरूपवर्धिनी या संस्थेमार्फत अभ्यासिका चालवण्यात येणार आहे. तसेच लहुजी शक्ती सेना पुणे शहर आणि पर्वती दर्शन मातंग समाज संघर्ष समितीतर्फे अभ्यासिकेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे नाव दिल्याबद्दल रघु अण्णांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय जगताप व आभार प्रदर्शन रवींद्र खंडाळे यांनी केले.