बालेवाडी चौक सुशोभीकरण भूमिपूजन खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न….!

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती दिना निमित्त नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने बालेवाडी चौक सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, नगरसेवक म्हणून काम करत असताना स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकत्रित पुतळा उभारण्याचे सुविचार मला सुचले हे भाग्य आहे. भूमिपूजन सोहळ्यास युवराज संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहिले हा फार मोठा क्षण आहे. अनेक कामे माझ्या माध्यमातून झाली, अनेक कामे होतील. परंतु आजचं हे या तिघांचे स्मारक आपल्या परिसरात उभे राहत आहे. यापेक्षा कोणतेही मोठे काम होऊ शकत नाही.

स्मारकाचे भूमिपूजन करताना खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती सांगितले की, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकत्र स्मारक उभे राहणे हे बालेवाडी गावातील ऐतिहासिक क्षण आहे. या तिघांचे स्मारक करणे हा विचार येणे सुद्धा फार मोठी बाब आहे. विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अमोल बालवडकर प्रयत्न करत आहेत. त्यांना निश्चित शिवाजी महाराजांचे आशीर्वाद असतील. शहाजी राजांनी संकल्पना मांडली जिजाऊ ने मनात आणले आणि शिवाजी महाराज छत्रपती झाले. हा शिवविचार आजच्या नव्या पिढीला या स्मारकाच्या माध्यमातून सांगू शकलो तर या स्मारकाचे सार्थक होईल.

यावेळी हभप चंद्रकांत वांजळे महाराज, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, भाजपा सहकार आघाडीचे प्रकाश बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, युवा नेते लहू बालवडकर, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, हभप शेखर जांभुळकर, उमा गाडगीळ, नारायण चांदेरे, अनिल ससार, अस्मिता करंदीकर, काळुराम गायकवाड, प्रकाश तापकीर, मंदार रारावीकर, आणि समस्त शिवप्रेमी आणि बालेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  अयोध्येतील राम मंदिरासाठी निधी संकलनाचा बाणेर बालेवाडी इथे शुभारंभ.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोनक गोटे यांनी तर आभार युवा नेते लहू बालवडकर यांनी व्यक्त केले.