बाणेर :
काही महिन्यांपासून बाणेर रस्ता नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. याचा नागरिकांना खुप त्रास होत आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखणाऱ्या बाणेर भागात मुख्य रस्त्यावर कुठेही पार्किंग व्यवस्था नाही आहे. त्यामूळे मोठ्या प्रमाणात दळण वळण असणाऱ्या या भागात नागरिकांना पार्किंग सुविधा अभावी त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला होणाऱ्या त्रासाची दखल घेत बाणेर मनसेचे युवानेते अनिकेत मुरकुटे यांनी बाणेर रोड ला गाड्यांच्या पार्कींग साठी उपाययोजना कराव्यात या साठी चतुश्रुंगी वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक म्हासळकर साहेब यांना मनसे तर्फे निवेदन दिले निवेदन देत नागरिकांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. तसेच सत्ताधाऱ्यां तिळगुळ घ्या पण पार्किंगला जागा द्या अशा आव्हानाचे फलक लावुन सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
याबद्दल बोलताना उपविभाग अध्यक्ष कोथरुड अनिकेत मुरकुटे यांनी सांगितले की बाणेर रस्त्यावरील मार्गावर अनेक दवाखाने, बॅंका, एटीएम केंद्रे, व विविध व्यवसायिकांनी मोठा खर्च करून कष्टाने दुकाने उभी केली आहेत. परंतु तेथे पार्किंगची सुविधा नसल्यामुळे तेथे कुणी जात नाही. परिणामी, नागरिकांसह दुकानदाराला ही याचा फटका बसत आहे.
पुढे ते म्हणाले की, हा रस्ता नो पार्किंग झोन करण्या अगोदर यावर महानगर पालिकेने जी उपाययोजना करायला पाहिजे होती ती केलेली नाही. या सर्व गोष्टी चा विचार करून पालिके कडून जि वाहणावर कारवाई चालू आहे, ती तात्काळ थांबवावी नाहीतर नो पार्किंगऐवजी सम- विषम तारखेप्रमाणे पार्किंग व्यवस्था निर्माण करून द्यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना उपविभाग अध्यक्ष कोथरुड अनिकेत मुरकुटे, शाखा अध्यक्ष अमित राऊत , गणेश चव्हण ,किरण रायकर उपस्थीत होते.