राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 57 जागांची निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांचा समावेश.

0
slider_4552

मुंबई :

राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या 57 जागांची निवडणूक जाहीर करण्यात आली असून या निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय निवडणूक आयोगाने जारी केले आहे. यानुसार या 57 जागांसाठी 10 जून 2022 रोजी मतदान होणार आहे.

यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांचा समावेश आहे. यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे.

21 जून ते 1 ऑगस्ट या काळात निवडणूक होत असलेल्या 57 राज्यसभा खासदारांची मुदत संपत आहे. यात 15 राज्यांमधील खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 6 खासदारांची मुदत 4 जुलै 2022 रोजी संपत आहे.

महाराष्ट्रातील या ६ खासदारांची संपत आहे मुदत
1. पियुष गोयल, 2. पी. चिदंबरम, 3. प्रफुल पटेल, 4. विकास महात्मे, 5. संजय राऊत, 6. विनय सहस्त्रबुद्धे

निवडणूक आयोगाने जाहीर केलेले वेळापत्रक
नोटिफिकेशन – 24 मे 2022, अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 मे 2022, अर्जांची तपासणी – 1 जून 2022, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 3 जून 2022
मतदानाचा दिवस – 10 जून 2022
मतदानाची वेळ – सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
मतदान मोजणी – 10 जून 2022 (सायंकाळी 5 वाजता)
निवडणूक पूर्ण करण्याची अंतिम दिनांक – 13 जून 2022

See also  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी