पुणे :
शिवसेनेच्या वतीने संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक प्रभागानुसार केंद्र सरकार विरोधात, वाढलेल्या महागाईच्या भस्मासुरा विरोधात नवीन ५८ प्रभागाच्या ५८ ठिकाणी आंदोलन घेण्यात येणार आहे.
प्रभागातील वाडी, वस्तीच्या आणि मोक्याच्या 58 ठिकाणी हि आंदोलन घेण्यात येणार आहेत. सध्या घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल, CNG गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यांचे जीवनमान खालावले आहे. इंधनांच्या सततच्या दरवाढीमुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. ह्यामुळे सामान्य माणसाचे दैनंदिन जनजीवन संपूर्ण पणे कोलमडून अनेक समस्यांना तोंड देऊन आयुष्य जगावे लागत आहे.
त्यामुळे सामान्य जनतेचा रोष आणि त्यांच्या मनातील असंतोष आता जाहीरपणे जाणवायला लागला आहे, त्यासाठी ह्या आंदोलनाद्वारे जनतेच्या मनातील आक्रोश केंद्र सरकारच्या विरोधातील राग शिवसेना केंद्रापर्यंत पोहोचवणार आहे. अशी माहिती शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगीतले. शुक्रवार दि १३ मे 2022 रोजी सायंकाळी ४.०० वा 58 ठिकाणी आंदोलनाचे आयोजन केले आहे.