पाषाण येथील पुणे मनपाच्या सार्वजनिक मैदानातच अवैध वृक्षतोड

0
slider_4552

पाषाण :

पाषाण पुणे येथील सुस रोड, साई चौक जवळ पुणे मनपाचे सार्वजनिक खेळाचे मैदान आहे. तिथे बरेच नागरिक सकाळ, संध्याकाळ फिरायला येतात. सुस रोड, पाषाण, सुतरवाडी परिसरातील बरीच मुले इथे रोज क्रिकेट व ईतर खेळ खेळताना दिसतात. पण दि. १० मे २०२२ ला सकाळी नागरिक व मुले गेल्यानंतर  अचानक वृक्षतोड होताना आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांनी दिसली. ही वृक्षतोड कशासाठी व कोण करतय याची परवानगी आहे का अशी विचारणा पाषाण एरिया सभे तर्फे पुणे मनपा ला करण्यात आली. तेव्हा मनपाला याचा थांगपत्ता नाही, मनपा हे करत नाही व आम्ही झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली नाही असे सांगण्यात आले.

तेव्हा काही नागरिकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन झाडे तोडणाऱ्यांना विचारणा केली. तो पर्यंत प्रचंड मोठे बाभूळ झाड ज्यावर शेकडो पक्षांचा निवास असायचा ते जमीनी पासून पूर्ण कापून खाली पडलेले होते व त्याच्या फांद्या तोडणे सुरू होते. ते झाड ना मधात ना रस्त्यात तरी का तोडले हे विचारले व कोणाचे काम आहे व इथे काय करणार आहे हे विचारले असता, आम्हला माहीत नाही याची परवानगी आहे आम्ही काँट्रॅक्टर ची माणसे आहोत आम्हाला बाकी काही माहीत नाही अशी उत्तरे मिळाली. दोन उंबराची व एक प्रचंड मोठे पिंपळाचे झाड पूर्ण छाटण्यात आले होते. त्यापैकी दोन झाडावर पाच वर्षे जुनी ३०/११/२०१७ ची १३ झाडांसंबंधी जीर्ण झालेली नोटीस दिसली. त्यात दोन झाडे पूर्ण कापणे व ११ झाडांचे पुनररोपन करणे असे लिहिले होते. नागरिकांनी गार्डन विभागाचे श्री. घोरपडे यांचेशी संपर्क करून हा प्रकार सांगितला. ते म्हणाले इतकी जुनी परवानगी चालत नाही, ही वृक्षतोड अवैध आहे. आम्ही तपास करून कारवाही करू असे समजले. त्यानंतर नागरिकांनी पोलीस कक्षाला या अवैध वृक्षतोडीबद्दल कळवले. थोड्याच वेळात पोलीस आले पण काम करणारे पसार झाले होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालेवाडी स्मशानभूमी ची साफसफाई

या अवैध वृक्षतोड कृत्याबद्दल व तेही पुणे मनपा व एरिया सभा आणि आजूबाजूच्या नागरिकांनी कोण करते हे व कशासाठी याची सुतनाम कल्पना नाही, त्याचा विरोध व गुन्हेगारांवर कारवायी करण्यात यावी यासाठी आज ११ मे २०२२ ला  सकाळी ७ वाजता आजूबाजूच्या सुस रोड परिसरातील जवळपास २५ सोसायट्या मधील शंभर नागरिकांनी मैदानात झाडांजवळ मानवी साखळी केली. ही झाडे मूळ जागेवरून आता व भविष्यातही काढण्यात येऊ नये, तोडण्यात येऊ नये. ही खेळणाऱ्यांना सावली देणारी व आजूबाजूच्या परिसराला हिरवळ, पक्षांना निवारा, खाद्य व भूजलासाठी महत्वाची भूमिका निभावणारी जुनी पन्नास वर्षापेक्षा मोठी देशी झाडे आहेत. ती कशालाही अडथळा नाही. भविष्यातही कुठल्याही सबबी खाली ती इथून हलवू व तोडू नये. पुणे मनपा चा आज पर्यंतचा रेकॉर्ड आहे पुनररोपन केलेली १०% पण झाडे जगत नाही.

तेव्हा वृक्षांचा जीवघेणा तो उपद्व्याप नकोच आणि वृक्षतोडीबद्दल दोषी शोधून काढून करावाही व्हावी यासाठी  जवळपास २५ ऑनलाईन तक्रारी मनपाकडे नोंदविल्या आहेत. नागरिक मोठया संख्येने मनपा आयुक्तांनाही लेखी विनंती करत आहे. जागतिक तापमानवाढ, बदलते वातावरण आणि त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम स्पष्ट दिसत असताना गरज नसताना वृक्षतोडीचा उपद्यव्याप का? हा संतप्त सवाल करत आम्ही हे होऊ देणार नाही व सतर्क राहून गरज पडल्यास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून ही परिसरातील हिरवळ व  सार्वजनिक मैदान वाचवू असा संकल्प जमलेल्या लहान मोठ्या सर्वांनी केला.