बाणेर :
शिवसेना प्रभाग क्रमांक 13 बाणेर बालेवाडी, सुस, महाळूंगे च्या वतीने दिवसेंदिवस वाढणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. म्हणून वाढत्या महागाई निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले. ये कैसे अच्छे दिन महागाई च्या आगीत मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकाला लोटले आहे. शिवसेनेच्या वतीने घोषणांचे बॅनर आणि रिकामा गॅस दाखवुन जोरदार घोषणा देत निषेध केला.
जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत’. सर्वसामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाची वाट लावणार्या त्यांच्या आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या निर्णय केंद्र सरकारचा निषेध करत शिवसेना प्रभाग क्रमांक 13 च्या वतीने राधा चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब चांदेरे (शिवसेना जिल्हा प्रमुख), राजेंद्र धनकुडे शिवसेना (शिवसेना उपशहरप्रमुख), ज्येष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटे, बाळासाहेब भांडे (शिवसहकारसेना जिल्हा संपर्क प्रमुख/शासकीय सदस्य), युवा सरपंच मयुर भांडे (युवासेना पुणे जिल्हा समन्वयक), संतोष मोहोळ (शिवसेना उपजिल्हा प्रमुख) संतोष तोंडे ( कोथरूड विभाग प्रमुख), प्रकाश भेगडे (जिल्हा समन्वयक), शिवसैनिक शाम बालवडकर, संतोष तोंडे (युवासेना उपजिल्हा प्रमुख), किसन सुतार (प्रसिद्धि प्रमुख) महेश सुतार, मयुर कोळेकर (विभाग प्रमुख )सिद्धेश गोलांडे (विभाग प्रमुख) महेश भांडे, संतोष भोसले तसेच प्रभाग क्रमांक १३ बाणेर, बालेवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील महिला पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना या विभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.