पुणे :
आकांक्षा कला क्रीडा केंद्राच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्त सुवर्ण उदय क्रीडा मंडळ, सिंहगड क्रिडा मंडळाच्या सहकार्याने जिल्हा स्तरीय महिला खुले गट, 45, 35 किलो वजन गट मुले कबड्डी स्पर्धा दि. 21 व 22 मे रोजी नेहरू स्टेडीयम समोरील मैदानावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 21 मे रोजी भाजपा सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर, आणि भाजपा सदस्य मयुरी प्रणव बालवडकर यांच्या हस्ते होणार आहे.




या स्पर्धेची माहिती देताना मुख्य आयोजक संदिप पायगुडे यांनी सांगितले की, आकांक्षा कला क्रीडा केंद्राच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या स्पर्धेदरम्यान दिवंगत संघटक ज्ञानेस्वर झोडगे, जेष्ठ सामनाधिकारी विजय खोपडे व जेष्ठ प्रशिक्षक नागेश कोंडे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ सामनाधिकारी, जेष्ठ प्रशिक्षक, जेष्ठ संघटक यांचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आव्हान पुण्यातील संघाना करत आहे.
या स्पर्धेत भाग घेवू इच्छिनाऱ्या संघानी संदिप पायगुडे – 9860177019, विजय पवार – 9021769316, संतोष जगदाळे –8888840123, विद्या जगताप – 9322365646 यांच्याशी संपर्क साधावा.








