बावधन महामार्गालगत सुशोभिकरण करण्याची सूर्यकांत भुंडे यांची मागणी.

0
slider_4552

बावधन :

बावधन गावचे ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत भुंडे यांनी सुस खिंड ते चांदणी चौक, बावधन, पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या दुतर्फा सर्विस रस्त्यालगत सुशोभिकरण करण्यासंदर्भातील निवेदन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना दिले.

माहिती देताना ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत भुंडे यांनी सांगितले की, सुस खिंड ते चांदणी चौक बावधन, पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या दुतर्फा सर्विस रस्ता अतिशय खराब झाला असुन तेथे कचऱ्याचे ढीग पडत आहे. त्यामूळे दुर्गंधी पसरली आहे. कचरा हटवून त्याचे सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. परिसरातील नागरिकांना या रस्त्याचा वापर करताना हे रस्ते सुंदर व सुशोभित असावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन दिले. सदरच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन हे काम लवकरच पुर्ण करुन घेऊ असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुर्यकांत भुंडे यांच्या सामाजिक कार्याचा अहवाल खासदार सुप्रिया सुळे यांना दाखवण्यात आला. त्यांनी देखील अहवाल पाहून परीसरात सुर्यकांत भुंडे करत असलेल्या कामाची प्रशंसा केली. येणाऱ्या काळात देखील सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचे काम करत राहावे अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

See also  शहरी भागात ऑक्सिजन पार्क ची निर्मिती झाली पाहिजे : वंदना चव्हाण