पुणे :
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफीसला फोन करुन रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा अज्ञाताने इशारा दिलाय.
धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञाताकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली. याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत.