‘क्रिकेटनामा’ स्पर्धेतील अंतिम सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेवर मात! डॉ. सागर बालवडकर यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण!

0
slider_4552

सुस:

सुस येथील ‘सनीज् वर्ल्ड’ येथील कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर सरकारनामा आयोजित ‘क्रिकेटनामा’ स्पर्धेतील अंतिम सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघाने शिवसेनेचा 22 धावांनी पराभव करत 2022 चा क्रिकेटनामा चषक जिंकला. शिवसेनेपुढे ४८ धावांचा डोंगर उभा केलेल्या राष्ट्रवादीने शिवसेनेला २६ धावांच्या पुढे जाऊ दिले नाही.

सेमी फायनल व अंतिम सामन्यात यष्टीरक्षण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांनी उत्कृष्ट झेल घेत सामन्याला कलाटणी दिली. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणांमुळे “बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अशीच उत्कृष्ट कामगिरी करत पुणे महानगर पालिकेत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवू असा आत्मविश्वास त्यांंनी व्यक्त केला.

राजकीय क्रिकेटचा आखाडा चांगलाच रंगतदार झाला. पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सामने सुरू होण्याअगोदरच राष्ट्रवादी काँग्रेसचा जिंकणार असा दाखविलेला आत्मविश्वास खरा करुन दाखविला. या सामन्यानबरोबरच पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील जिंकून दाखवू असा आत्मविश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

See also  सुसगाव, पाषाण परिसरामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी...