हॉटेल चालकानी रस्त्यामध्ये केलेल्या कार्यक्रमा विरोधात नागरिकांचे आंदोलन. पोलिसांनी दाखल केला गुन्हा…!

0
slider_4552

बाणेर :

काल दी १५ जुलै रोजी बाणेर येथे रस्ता अडवून हॉटेल व १बीएचके बारचे उद्घाटन पार्टी करण्यात आली. या उद्घाटन कार्यक्रमासाठी क्रोमा शोरूम पासून साई चौक बालेवाडी कडे जाणारा पूर्ण रस्ता स्टेज बांधून बंद करण्यात आला होता. व जोरात स्पीकर लावून हा कार्यक्रम संध्याकाळी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा विरोधात परिसरातील नागरिकांनी संध्याकाळी सहा नंतर वारंवार पोलीस प्रशासनास फोन केले, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः जाऊन आयोजकांना कार्यक्रम बंद करण्यास सांगितले. परंतु आयोजकांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारे दात दिली नाही. तसेच पोलिसांनी देखील बघ्याची भूमिका घेतल्यामुळे. परिसरातील नागरिकांनी कार्यक्रम स्थळे आंदोलन केले, यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करून आयोजकांचा निषेध व्यक्त केला. नागरिकांचा रोष बघून अखेर पोलिसांना हा उद्घाटन पार्टी लवकर बंद करावी लागली.

पोलीस प्रशासनातर्फे आयोजकांना वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने स्टेज टाकण्यास परवानगी देण्यात आली होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संध्याकाळच्या वेळात व रात्रीच्या वेळात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा पोलिसांना फोन केले. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी त्या ठिकाणी आले परंतु अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यापेक्षा नुसते बघायची भूमिका घेतल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

रात्री दहा नंतर ज्या वेळेस ही पार्टी संपली त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह झाले व अचानक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी येऊन तेथील वाहतूक नियंत्रण करताना दिसून येत होते. पार्टी संपल्यावर संबंधितांवर चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे विनापरवाना रस्ता बंद करणे व विनापरवाना कार्यक्रम घेणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

See also  बाणेर येथे मनसेच्या वतीने मराठी च्या मुद्यावर फोन पे ला दणका !