कबड्डी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

0
slider_4552

महाळुंगे :

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या सहकार्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाणेर- बालेवाडी, सूस व महाळुंगे आयोजित व बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉल येथे कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त कबड्डी दिन साजरा करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय निमंत्रित ‘कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक’ कबड्डी स्पर्धा २०२२ चे उद्धाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित संपन्न झाले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, कबड्डीला चांगले दिवस यावेत म्हणून शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचे मोलाचे योगदान लाभले. कबड्डीला त्यांनी लोकाश्रया बरोबर राजाश्रय लाभावा यासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रात कबड्डी खेळाला वारसा व परंपरा असून हा खेळ वाढविण्यात कार्यकर्त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. खेळाडूंनी खेळामध्ये हार जीत पेक्षा आपण जिंकण्यासाठी काय प्रयत्न केले याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकिय समीकरणे बदलत राहतात, आम्ही सत्तेत असताना खेळासाठी विवीध धोरणे राबविली, आता देखील खेळाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.

कबड्डी दिनाच्या निमित्ताने कबड्डी वाढीसाठी अविरतपणे प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांचा होतकरू खेळाडू, ज्येष्ठ पत्रकार, विविध स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सचिव ऍड. आस्वाद पाटील, खजिनदार मंगल पांडे, स्पर्धेचे मुख्य आयोजक व महाराष्ट्र कबड्डी असोसिएसनचे सदस्य माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, कार्यवाह राजेन्द्र आंदेकर, सहकार्यवाह दत्तात्रय झिंझुर्ड, मधुकर नलावडे, सहकार्यवाह योगेश यादव, सहकार्यवाह दत्ता कळमकर, संदिप पायगुडे, स्पर्धा समिती अध्यक्ष समीर चांदेरे, कार्याध्यक्ष किरण चांदेरे, डॉ सागर बालवडकर, पुनम विधाते, नितीन कळमकर, अनिल यादव, विशाल विधाते, प्रमोद निम्हण, सुर्यकांत भुंडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पाषाण येथे लसीकरण सुरू