औंध भागातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली विविध विषयांबाबत सविस्तर आढावा बैठक

0
slider_4552

पुणे :

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर व अधिकारी यांचेबरोबर औंध भागातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत खालील विषयांबाबत लवकरात लवकर कार्यवाही व उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकारी वर्गास दिलेले आहेत.

१) औंध परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी चेंबरची दुरावस्था झाल्यामुळे सांडपाणी मुख्य रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, अशी चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करावीत.
२) मेडीपॉइंट सोसायटीच्या जवळील साई हेरीटेज सोसायटीच्या शेजारचा कचरा उचलला जात नाही तो नियमितपणे उचलणे.
३) बोपोडीतील हॅरीस पुलाखालच्या परिसरात धोकादायकपणे पाणी साचते यासाठी तातडीने उपाययोजना करून साचलेले पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा.
४) बोपोडी व चिखलवाडीतील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित होते यासंदर्भात तातडीने उपाययोजना करणे.
५) औंध गाव व परिसरात मुख्य रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत ते तातडीने बुजविणे.
६) औंध रोड येथील खडकी स्टेशन जवळील होत असलेल्या वाहतूक कोंडीबद्दल सबंधित अधिकारी व वाहूक पोलीस यांचेबरोबर पाहणी करून लवकरच उपाययोजना करणार आहे.
७) औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून नागरिकांना याबाबत सतर्क करावे.
८) सध्या पावसाचा जोर वाढला असून काही भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते. यासाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करणे व त्यांची सोय करणे.

या बैठकी वेळी सचिन वाडेकर, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, सुनील माने, गणेश नाईकरे, अभिजित गायकवाड, सुप्रीम चोंधे, शारदाताई पुलावळे, हेमंत पांचाळ, अजय नागटिळक, अरविंद पाटील तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

See also  माॅडर्न महाविद्यालयाच्या वतीने मुला मुलींना छञ्यांचे वाटप.