बालेवाडीत बारच्या उद्घाटनासाठी रस्ता बंद.

0
slider_4552

बाणेर :

पुण्याची संस्कृती बदलत चालली असली तरी बार आणि पब चे वास्तव्य दिवसेंदिवस वाढत असून त्यांना पाठबळ देणारी इच्छाशक्ती ही वाढताना दिसत आहे. बालेवाडी हायस्ट्रीट कमिन्स कंपनी जवळ १ बीएचके पबच्या उद्घाटनासाठी गुरुवारी दुपारपासून पूर्ण रस्ता बंद केला आहे. यावर नागरिकांनी वारंवार तक्रार दिली तरीही काहीच होत नसल्याची खंत सोशल मीडियावर नागरिक व्यक्त करत आहे.

बाणेर, बालेवाडी, औंध परिसरामध्ये अनेक पब व बार असून याचा त्रास नागरिकांना होतच आहे. गुरुवारी दुपारपासून हा रस्ता बंद करण्यात आला असून, रस्त्यावरच स्टेज टाकण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी पोलीस यंत्रणेला कळवले तरीही रस्ता खुला करण्यात आला नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

या घटने बद्दल परिसरातील नागरीक सारंग वाबळे म्हणाले की, अगोदरच वाहतूक कोंडी मुळे बाणेर बालेवाडी परिसरातील नागरीक त्रस्त असताना एका कार्यक्रमासाठी रस्ता बंद करून नाहक त्रास दिला जात आहे. कार्यक्रम घेण्यासाठी रीतसर परवानगी घेवून काही अंशी रस्त्याचा वापर करून रस्ता वाहतुकी साठी मोकळा करुण देणे गरजेचे होते. अशा कार्यक्रमाला परवानगी कशी मिळते हा मोठा प्रश्न आहे.

याबाबत चतुर्शिंगी वाहतूक विभागाचे पोलीसांनी सांगितले की, माहिती मिळाली असून कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठवले आहे. प्रत्यक्षात बघून संबंधितांवर कारवाई केली जाईल. रस्ता खुला करण्याची कारवाई सुरू केली आहे.

याबाबत बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांनी मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला आहे. मुळातच रस्ता बंद करण्या इतकी धाडस त्यांच्यात येथे कुठून अशा प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन दिवस नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परिसरात घडत असलेल्या अशा इव्हेंटला पोलिसांनी परवानगी देऊ नये असे सूचना विविध ग्रुप वर करण्यात आल्या. या सर्व घटनेचा नेमका पाठीराखा कोण? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

See also  बालेवाडी फाट्यावरील सेक्स रॅकेटचा भांडाफोड चतुःशृंगी पोलिसांची कारवाई.