सुतारवाडी :
भारताच्या स्वातंत्र्यला यंदा 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबवली आहे. म्हणुनच भाजपा युवा नेते शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने सुतारवाडी येथील माध्यमिक विद्यालय, सुतारवाडी या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्याच्या दृष्टीने तिरंगा जनजागृती रॅली काढली.
याबद्दल माहिती देताना भाजपा युवा नेते शिवम सुतार म्हणाले, भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा आपल्यासाठी फार आनंददायी क्षण आहे. म्हणूनच परिसरातील सर्वांनीच हर घर तिरंगा या अभिमानास्पद मोहिमेमध्ये सहभागी व्हावे याकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जनजागृती रॅली काढली होती. विद्यार्थ्यांसोबत घोषणा आणि पोस्टर दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी असा प्रयत्न करण्यात आला. निश्चितच आपल्या परिसरात प्रत्येक घरामध्ये तिरंगा ध्वज फडकेल अशी अपेक्षा आहे. आपल्या सर्वांसाठीच हा क्षण फार अभिमानाचा आहे.
यावेळी युवा नेते शिवम सुतार यांच्यासोबत मुख्याध्यापक शिवाजी ताम्हाणे, प्रकाश बर्वे, वि.दा.पिंगळे व संदीप भालेराव इत्यादी शिक्षक विद्यार्थी आणि शिवम सुतार मित्रपरिवार उपस्थित होते.