श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयात विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिली मानवंदना

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील एस के पी कॅम्पस मधील श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करुण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मानवंदना दिली.

ही संकल्पना डॉक्टर सागर बालवडकर सचिव श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्था यांच्या विचारातून साकारण्यात आली. अतिशय सुंदर आकर्षक पद्धतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत शब्दांमध्ये 75 व्या स्वातंत्र्य दिनास आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली. आपल्या कल्पक विचारात मधून डॉ.सागर बालवडकर नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.

या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य पोखरकर सर आणि इतर शिक्षक वृंद आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.

See also  सुस गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथ उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व राज्यस्तरीय कुस्त्यांचे आयोजन.