गणेशखिंड :
गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. या महोत्सवाची सुरवात पोस्टर स्पर्धेने झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पोस्टर सादर केली. याशिवाय स्लोगन, कविता , निबंध स्पर्धा आँनलाईन घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या विजेत्यांना १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदना नंतर पारितोषिके देण्यात आली.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
निबंध स्पर्धा : १. एश्वर्या माने -FY BSc
2. ऋतुजा देव – FY BSc
3. गौतम करदिले – FY BSc
कविता स्पर्धा : १. ज्वालांती सुंदरमं – MSc II
2. विवेक खंदारे – MSc II
3. नताशा बालसरे – FY BSc
स्लोगन स्पर्धा : १. गौतम करदले : FY BSc
२. स्वप्निल ढाले – TY B A
3. जुही दुबे – MSc II
पोस्टर स्पर्धा : १. ऋतुजा कांबळे : FY B SC
2. निहारिका दिक्षीत : FY B SC
३. सोनल गोर्डे व प्रणाली शेलार : FY B SC
या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्यासोबत छायाचित्रे काढून ती सादर केली. महाविद्यालयातील कर्मचार्यांनी एतिहासिक स्थळावर जाऊन ध्वजासोबत कुटुंबातील सदस्यांसोबत छायाचित्रे घेतली.
१४ आँगस्ट या दिवशी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी बाणेरच्या तुकाई टेकडीवर वसुंधरा अभियानात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.
१५ ऑगस्टला महाविद्यालयात ध्वजवंदन होऊन प्रभातफेरीसाठी प्राध्यापक, विद्यार्थांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रभात फेरीची सुरवात माॅडर्न महाविद्यालयातुन झाली. ती सेनापती बापट रोडवरुन चतूर्शुंगी मंदीर, जे डब्लू मॅरिएट वरुन बहिरट वाडी वरुन १.५ कि मी. चालुन परत महाविद्यालयात येऊन पूर्ण झाली. यात महाविद्यालयीन व शाळेचे शिक्षक व विद्यार्थी सगळे मिळून १००० सहभागी होते.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमामधे महाविद्यालयातील प्रत्येकाने उत्साहाने सहभाग घेतला.