शिवाजीनगर :
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा व पुणे बार असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने दि.13/08/2022 रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक एक दिवसीय वकील परिषदेत मुख्य विषय दस्त नोंदणी कौशल्य पूर्ण विकास हा होता.







या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय भुषण आर. गवई साहेब, विशेष अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय पी. बी. वराळे साहेब, सन्माननीय अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती व राज्य ग्राहक न्यायाधिकरणाचे सन्माननीय सुरेंद्र तावडे साहेब, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे व्हॉईस चेअरमन ॲड. राजेंद्रजी उमाप सर, बार कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य ॲड. जयंत जायभावे सर, पुणे विभागाचे पालक सदस्य ॲड. हर्षद निंबाळकर सर, ॲड.विठ्ठल कोंडे देशमुख सर, ॲड. अहमदखान पठाण आर, व महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सन्माननीय सर्व सदस्य वयावेळी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने वकील बंधू आणि भगिनी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल चे व्हॉईस चेअरमन ॲड. राजेंद्रजी उमाप सर यांनी पुणे बार असोसिएशनला वकिलांची आरोग्याची निकड लक्षात घेऊन रुग्णवाहिका प्रदान केली. *सदर रुग्णवाहिकेची चावी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय श्री भुषण आर. गवई साहेब व प्रगतशील शेतकरी बाबुरावजी उमाप यांच्या हस्ते पुणे बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांना देण्यात आली.
सदर परिषदेचे सूत्र संचलन ॲड. लक्ष्मणराव येळे पाटील यांनी केले व सदर परिषदेचे आभार पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे सर यांनी केले. त्यांनी बार बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे व्हॉईस चेअरमन ॲड. राजेंद्रजी उमाप सर यांचे विशेष आभार मानले.
तसेच पुणे बार असोसिशनचे अध्यक्ष ॲड पांडुरंग थोरवे सर व सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मण येळे पाटील सेक्रेटरी – ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोबा तपासणीस ॲड. शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले, ॲड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड. कुणाल अहिर , सदस्य ॲड. अमोल भोरडे ॲड. रितेश पाटील व मोठ्या संख्येने न्यायाधीश व वकील बांधव उपस्थित होते.








