स्व. राजीव गांधी यांची ७८ वी जयंती निमीत्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित अभिवादन.

0
slider_4552

पुणे :

स्व. राजीव गांधी यांची ७८ वी जयंती यानिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध अशा राजीव गांधी प्राणिसंग्रहालया बाहेरील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सकाळी उपस्थित राहिले. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा सत्कार अरविंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सन्माननीय मा. खासदार, आमदार यांच्यासह पुण्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक : राज ठाकरे