भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक : राज ठाकरे

0
slider_4552

पुणे :

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती झाल्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भोंग्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, “भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. भोंग्याच्या आवाजाचा त्रास हा हिंदूनाच होत नाही, तर मुस्लिमांनादेखील होत असल्याचे एक उदाहरण देऊन सांगितले की, “एका मुस्लिम पत्रकाराच्या लहान बाळाला भोंग्याचा त्रास झाला. त्यानंतर त्या पत्रकाराने स्वतः मशिदीत जाऊन भोंगा बंद करायला सांगितले. हा किस्सा त्या मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितला होता”.

देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहावं. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला.

5 जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. आम्हाला कुठली ही दंगल नको, असं ते म्हणालेत.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार आहे. आणि 5 जूनच्या दिवशी अयोध्येला जाणार आहे. 5 तारखेला सहकाऱ्यांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार आहे, अशी घोषणा राज यांनी केली.

आमची सर्व तयारी सुरू आहे आम्हाला शांतता भंग करायची नाही आहे. प्रार्थनेला विरोध नाही पण जर त्यांना लाऊड स्पीकर वर ऐकवायचं असेल तर आम्ही ही आरत्या भोंग्यावर लाऊ, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलंय.

See also  खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटसह देशातील सर्व कँटोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क आकारणे थांबविले