श्रीनाथ सोशल फाउंडेशन माध्यमातून तापकीर उद्यान येथे “श्रमदान शिबीर”

0
slider_4552

बाणेर :

श्रीनाथ सोशल फाउंडेशन व मा. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातून आज रविवार दि.१७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ‘पर्यावरणप्रेमी कै. बाळकृष्ण गुलाबराव तापकीर उद्यान’ येथे “श्रमदान शिबीर” पार पडले. पुणे महानगरपालिकेने दुर्लक्षित केलेल्या या उद्यानाची बिकट अवस्था होऊ नये म्हणून माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून हे शिबिर संपन्न झाले.

या शिबिराची माहिती देताना मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या संकल्पनेतून पुर्ण झालेले उद्यान पुणे महापालिकेच्या गार्डन विभागाकडून ताब्यात घेण्यात आलेले नाही. पुणे महानगरपालिका गार्डन विभाग हे भवन विभागाने उभारलेल्या वास्तू ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, गार्डन विभागाला मा. आयुक्त विक्रम कुमार साहेब यांनी व अतिरिक्त आयुक्त बिनवडे साहेब व खेमणार साहेब यांनी सूचना करूनही हे उद्यान ताब्यात घेतले नाही. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत भवन विभागाच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या ज्युपिटर हॉस्पिटल समोरील दोन उद्यानांची देखील गार्डन विभागाने ताब्यात न घेतल्याने अक्षरशः दुरवस्था झालेली आहेत. तरी महानगर पालिकेने काहीतरी पॉलिसी तयार करून ही उद्यानाचे देखभाल करावी अन्यथा या उद्यानासाठी झालेले सगळा खर्च वायाला जाणार आहे. दुरावस्थेत चाललेल्या या उद्यानाची नागरिकांना सोबत घेऊन ‘श्रमदान शिबीर’ राबवत श्रीनाथ सोशल फाउंडेशन च्या वतीने स्वच्छता केली आहे. परंतु लवकरात लवकर या उद्यानाला ताब्यात घेऊन गार्डन विभागाने याची देखभाल करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करत आहे.

यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर पायाला दुखापत झाल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु त्यांच्या माध्यमातून आणि प्रभागातील भाजपा पदाधिकारी यांनी तसेच पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, श्रीनाथ सोशल फाउंडेशन चे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे श्रमदान करत या शिबिरामध्ये सहभाग घेतला.

 

See also  मंदार घुले यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन