औंध :
औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी २७-२८ ऑगस्ट रोजी इंदिरा शाळा, औंध येथे कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांच्या प्रेरणेने निराधार विधवा, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्या सेवार्थ सिद्धार्थ शिरोळे (आमदार शिवाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराची माहिती देताना सनी निम्हण म्हणाले की, सार्वजनिक आयुष्यात काम करत असताना रोजच्या धकाधकीच्या जीवनात दीनदुबळ्यांची कष्ट कमी करण्यासाठी कार्य केले पाहिजे, ही कार्यसम्राट मा. आमदार विनायक निम्हण यांची शिकवण आहे. जनसामान्यांचे कष्ट कमी होऊन शासनाच्या उपाययोजनेचा त्यांना लाभ व्हावा यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून नागरिकांचे कार्य सुलभ कसे होईल यासाठी आम्ही सातत्याने विविध लोकोपयोगी उपक्रम व अभियान राबवित आलो आहे आणि भविष्यातही राबवित राहू.
याच दृष्टिकोनातून ‘शासन आपल्या दारी’ मार्फत संजय गांधी(पेंशन) अंतर्गत रू. १२०० दरमहा शासकीय अनुदान मिळण्यासाठी सर्व कागदपत्रासह मोफत नावनोंदणी शिबिर औंध, सोमेश्वरवाडी, बालेवाडी मधील नागरिकांसाठी २७-२८ ऑगस्ट रोजी इंदिरा शाळा, औंध येथे सकाळी १० वा. ते सायंकाळ ५वा. पर्यंत राबविण्यात येत आहे. याचा आपण विशेष लाभ घ्यावा व शिबिरास भरभरून प्रतिसाद द्यावा, अशी नम्र विनंती माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी केली आहे.