नवी दिल्ली :
दिल्लीतील दारूचा मुद्दा सोडून भाजप आता दिल्लीतील शाळे मध्ये मोठा घोटाळा झाला आहे? म्हणून त्याची चौकशी करणार आहे . याच मुद्द्यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेतून भाजप सरकारचा सडकून समाचार घेतला.







दारू विक्री लायसन घोटाळा झाला म्हणून सीबीआय ने मनीष सिसोदिया यांच्या घरावर रेड केली होती , १४ तास झाडा झडती करून त्यांच्या हाती काय लागले? याचे उत्तर १० दिवसा नंतरही मिळाले नाही.
भाजप सरकार ही शिक्षण विरोधी पार्टी आहे . गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने सुमारे ७५ हजार सरकारी शाळा बंद केल्या आहेत त्यापैकी यू पी मध्ये २६ हजार शाळा , एम पी मध्ये २२ हजार शाळा व उत्तरा खंडात २२ हजार शाळा बंद करून . सुमारे १२ हजार खाजगी संस्था सुरू केल्या आहेत.
शिक्षण ही शासनाची जबाबदारी असते मात्र हे शिक्षा विरोधी सरकार आपल्या जबाबदारी पासून पळ काढून खाजगी संस्थाला लाभ व्हावा म्हणून सरकारी शाळा बंद करीत आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी कोण करणार?








