पुणे बार असोसिएशन चे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे म्हणून पुढचे पाऊल

0
slider_4552

पुणे. :

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे ही पुणे बार असोसिएशन आणि पुण्यातील जनतेची १९७८ पासुन ची मागणी गुणवत्तेच्या नुसार आणि कोणत्याही परिस्थितीत पुण्यात व्हावे म्हणुन एक कायमस्वरूपी कृती समिती स्थापन करण्या बाबत पुणे बार असोसिएशन च्या आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कृती समितीचे कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला .मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुढील दिशा आता पुणे खंडपीठ कृती समिती ठरवणार आहे आणि त्या प्रमाणे आता पुन्हा एकदा ही मागणी पूर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यात येणार आहे

या वेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे विद्यमान सदस्य हर्षद निंबाळकर ,अहमदखान पठाण आणि राजेंद्र उमाप यांच्या सह बार कौन्सिल चे मा चेअरमन डॉ सुधाकर आव्हाड आणि डी डी शिंदे यांच्या सह बार असोसिएशनचे अनेक माजी अध्यक्ष ,पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते

या वेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड पांडुरंग थोरवे यांनी या वर कायमस्वरूपी कृती समिती ची गरज असल्याचे सांगितले आणि ही कृती समिती लवकर जाहीर करणार असल्याचे सांगितले

या वेळी पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे आणि ते कसे योग्य आहे या बाबत डॉ सुधाकर या आव्हाड ,ऍड हर्षद निंबाळकर ,ऍड अहमदखान पठाण ऍड राजेंद्र उमाप ,ऍड गिरीश शेडगे ,सतीश पैलवान ,ऍड मंगेश लेंडघर ,ऍड प्रतिभा घोरपडे ,ऍड शाहिद आखतर यांनी उपस्थित वकील वर्गाला संबोधित केले .

याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम व कार्यकारिणी सदस्य तसेच मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते

See also  दिवाळी दसरा इतकाच शिवराज्याभिषेक दिन आपल्यासाठी महत्त्वाचा : प्रविण तरडे. सनी निम्हण यांच्या वतीने सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन