पाषाण तलाव परिसरात पडणाऱ्या कचऱ्यावर उपाययोजना करण्याची शिवम सुतार यांची मागणी.

0
slider_4552

सुतारवाडी :

सुतारवाडी महामार्ग लगत महादेव मंदिर व पाषाण तलाव परिसरात सर्रासपणे कचरा पडत असून यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिका व महामार्ग विभाग या दोघांच्या समन्वयाच्या अभावाने आणखी किती दिवस या ठिकाणी राडारोडा व कचरा पडणार असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

पाषाण तलाव परिसर व महादेव मंदिरा लगत पडत असलेला कचऱ्यावर उपाययोजना म्हणून माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार यांनी महामार्ग विभागाला निवेदन देऊन या ठिकाणी जाळ्या बसवण्याची मागणी केली आहे. परंतु या मागणीवर अद्याप काहीच प्रक्रिया झाली नसल्याचे लक्षात येत आहे.

ही जाळी बसवल्यामुळे पडणारा कचरा व राडारोडा या ठिकाणी पडणार नाही. महादेव मंदिर परिसरा बरोबरच पाषाण तलावात होणारे प्रदूषणही रोखले जाईल यासाठी महामार्ग विभागाशी वर्षभरापासून पाठपुरावा करून जाळी बसवण्याची मागणी केली आहे. महामार्ग विभागाकडून मात्र दुर्लक्ष होत आहे, अशी माहिती शिवम सुतार यांनी दिली.

याबाबत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांनी सांगितले की, जाळ्या बसवल्यास पडणारा कचऱ्याला आळा बसेल, त्याचबरोबर पाषाण तलाव परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. गेल्या महिन्याभरात जवळपास या ठिकाणाहून 60 टन कचरा उचलला आहे. त्यामुळे महामार्ग विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात. याबाबत महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

 

See also  बाणेर रोडवर समा-विषम तारखेप्रमाणे पार्किंग व्यवस्था करण्याची मनसेची मागणी.