वसूंधरा अभियान मार्फत चित्रकला स्पर्धा आयोजन..

0
slider_4552

बाणेर :

वसूंधरा अभियान बाणेर या संस्थे मार्फत तूकाई टेकडीवर रविवार दि 11 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7:30-10 वेळेत हजारो विद्यार्थ्थांमार्फत निसर्ग चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वसूंधरा अभियान बाणेर या संस्थे मार्फत तूकाई टेकडीवर पर्यावरण संवर्धन कार्य चालू असून जैवविविधता प्रसारासाठी संस्थे च्या माध्यमातून अनेक पर्यावरण पूरक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, बावधन, सुस, महाळुंगे या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा आयोजित केली असून, सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व अल्पोपहार दिला जाणार आहे.

वसुंधरा संस्थेने 2006 पासून पर्यावरणाची चळवळ चालू केली आहे, त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, प्रत्यक्ष पाहता यावी, हा पर्यावरण चित्रकला स्पर्धेचा उद्देश आहे. मुलांमध्ये पर्यावरण जागृती होणे हा उद्देश आहे, बंदिस्त खोल्यांच्या ऐवजी निसर्गरम्य वातावरणात निसर्ग चित्र काढण्याचा विद्यार्थ्यांना एक विलक्षण आनंद घेता येतो.

संस्थे मार्फत वृक्ष संवर्धनासाठी ३० पाण्याचा टाक्या बांधल्या आहेत. संस्थे मार्फत आतापर्यंत टेकडीवर लोकसहभागातून 40,000 पेक्षा अधिक देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. संस्थे मार्फत तुकाई टेकडी वर हिरवळ निर्माण केली असुन वृक्ष संवर्धनाचे काम जोरदार सुरू आहे.

See also  अमोल बालवडकर यांच्या वतीने आरोग्य शिबिर राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा.