अमोल बालवडकर यांच्या वतीने आरोग्य शिबिर राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा.

0
slider_4552

बालेवाडी :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आपल्या शरीराची तपासणी करून घेतली.

याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-औंध येथील सुमारे २१५ जणांनी शिबिरात सहभागी होवुन मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. एक उत्कृष्ट कुशल नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा वाढदिवस समाज हिताचा उपक्रम राबवून साजरा केला आहे. समाजसेवेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही केला आहे. या समाज उपयोगी उपक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशन व बेनिकेअर हॅास्पिटलचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अध्यक्ष जगदिशजी मुळीक यांनी शिबिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत पुणे मनपा चे माजी नगरसेवक दिपक पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॅा.राजेश देशपांडे उपस्थित होते.

See also  भाजप विरुद्ध महा विकास आघाडी क्रिकेट सामन्यांमध्ये भाजपचा निसटता संघर्षमय विजय....