बालेवाडी:
राष्ट्रवादी काँग्रेस बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे आयोजित कबड्डी महर्षी स्व.शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व पुणे लिग कबड्डी स्पर्धेचे आज अतिशय चुरशीची अंतिम सामने पार पडले. स्व.शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय निमंत्रित स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले या सर्व संघांमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पुरुष गटातून वाघजाई संघ रत्नागिरी तर महिला गटातून शिवशक्ती संघ मुंबई बुवा साळवी चषकाचे मानकरी ठरले.
तर राज्याचे विद्यमान विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पुणे लीग कबड्डी सामन्यात १४ सहभागी झाले यातून पुरुष गटात बलाढ्य बारामती संघ तर महिलांमध्ये शिवनेरी जुन्नर संघ विजयाचे मानकरी ठरले.
या दोन्ही स्पर्धांमधील विजयी संघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब व सौ.प्रतिभा पवार यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात आले.
राज्यस्तरीय स्व. बुवा साळवी चषक २०२२ अंतिम निकाल
महिला विभाग
१) प्रथम क्रमांक १,५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह – शिवशक्ती संघ,मुंबई
२) द्वितीय क्रमांक १,००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह – राजमाता जिजाऊ संघ, पुणे
उत्कृष्ट चढाई २०,०००/ – मंदिरा कोमकर (राजमाता जिजाऊ संघ,पुणे)
उत्कृष्ट पकड २०,०००/ – रेखा सावंत (शिवशक्ती संघ,मुंबई)
अष्टपैलू खेळाडु २५,०००/ – सोनाली शिंघटे (शिवशक्ती संघ,मुंबई)
पुरुष विभाग
१) प्रथम क्रमांक १,५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह (वाघजाई मंडळ, चिपळूण)
२) द्वितीय क्रमांक १,००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन, नांदेड)
उत्कृष्ट चढाई २०,०००/ – सुनील दुबिले (बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन, नांदेड)
उत्कृष्ट पकड २०,०००/- शुभम शिंदे (वाघजाई मंडळ, चिपळूण)
अष्टपैलू खेळाडु २५,०००/- अजिंक्य पवार (वाघजाई मंडळ, चिपळूण)
पुणे लिग कबड्डी स्पर्धा २०२२ अंतिम निकाल –
महिला विभाग
१) प्रथम क्रमांक १,५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह (शिवनेरी जुन्नर)
२) द्वितीय क्रमांक १,००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (लयभारी पिंपरी-चिंचवड)
३) तृतीय क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (बलाढ्य बारामती)
४) चतुर्थ क्रमांक ५०,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (वेगवान पुणे)
उत्कृष्ट चढाई २०,०००/- निकिता पडवळ (लयभारी पिंपरी-चिंचवड)
उत्कृष्ठ पकड २०,०००/- दिव्या गोगावले (शिवनेरी जुन्नर)
अष्टपैलु खेळाडु २५,०००/ – मंदिरा कोमकर(शिवनेरी जुन्नर)
पुरुष विभाग
१) प्रथम क्रमांक १,५०,०००/- रूपये व सन्मानचिन्ह (बलाढ्य बारामती)
२) द्वितीय क्रमांक १,००,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (सिंहगड हवेली)
३) तृतीय क्रमांक ७५,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (लयभारी पिंपरी चिंचवड)
४) चतुर्थ क्रमांक ५०,०००/- रुपये व सन्मानचिन्ह (वेगवान पुणे)
उत्कृष्ट चढाई २०,०००/ – विशाल ताठे (सिंहगड हवेली)
उत्कृष्ट पकड २०,०००/- योगेश कट्टीमणी (बलाढ्य बारामती)
अष्टपैलू खेळाडु २५,०००/- अजित चव्हाण (बलाढ्य बारामती)
याप्रसंगी आमदार सचिन आहिर, मुख्य आयोजक माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, उद्योजक विठ्ठलशेठ मनियार, मारुतराव धनकुडे, अंकुश काकडे, युवक अध्यक्ष मेहबुब शेख, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक आस्वाद पाटील, मधुकर नलावडे, सचिन भोसले, वासंती बोर्डे-सातव, पुणे जिल्हा सर कार्यवाह राजेंद्र आंदेकर, नांदेड कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक पटेल सर, आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, सुप्रिया बडवे, शकुंतला खटावकर, सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाहक दिनेश चव्हाण, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. सागर बालवडकर, पुनम विशाल विधाते व संयोजन समितीचे अध्यक्ष समिर चांदेरे, किरण चांदेरे, विशाल विधाते अदि मान्यवर उपस्थित होते.