माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर संपन्न…

0
slider_4552

बाणेर :

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व माजी नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या माध्यमातून बाणेर बालेवाडी डॉक्टर असोशियन व संजीवनी व्हीटालाईफ हॉस्पिटल यांच्या माध्यमातून व सहकार्यातून बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयांमध्ये भव्य आरोग्य शिबिर आज संपन्न झाले. परिसरातील २०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराची माहिती देताना माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या की, या शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी मोफत केली.तसेच या शिबिरामध्ये परिसरातील श्रमिक वर्ग यांनी सहभाग घेतला. कष्टकरी, कामगार, अंग मेहनत करणारे नागरिक हे नेहमीच आपला आजारपण अंगावर काढत असतात काही नागरिक इच्छा असताना देखील डॉक्टरांची फी जास्त असल्यामुळे दवाखान्यात जात नाहीत म्हणुनच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित केले होते. माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी उपस्थित डॉक्टरांचे आणि नागरिकांचे आभार मानले तसेच माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहराची अध्यक्ष माननीय जगदीश जी मुळीक सरचिटणीस राजेशजी येनपुरे, दीपक पोटे, गणेश कळमकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, बाणेर बालेवाडी डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, डॉ.सुपेकर, बाणेर बालेवाडी सोसायटी असोशियन चे अध्यक्ष रमेश रोकडे, अँड.तारे, शकील सलाटी या प्रभागाचे अध्यक्ष उमाताई गाडगीळ उपस्थित होते.

See also  पाषाण तलावातील दुर्गंधीमुळे स्थानिकांना त्रास.